Wednesday, 11 September 2019


                  Electrician Tools

     कामाच्या वेळी वायरमन आणि इलेक्ट्रिशियनला योग्य टूल्सचा वापर करणे महत्वाचे असते. कारागिरांची कामातील अचूकता आणि कामाचा वेळ हा योग्य टूल्सच्या वापरावर अवलंबुन असतो. जर टूल्स योग्य प्रकारे वापरले आणि सांभाळले तर, वायरमन / इलेक्ट्रिशियनची कार्यक्षमता वाढलेली असेल आणि कामाच्या सरावात तो कारागीर तरबेज झाला असेल.
टूल्सच्या योग्य पध्दतीने निगा व देखभाल केल्यास टूल्सचे आयुष्य तर वाढतेच - वाढते, त्यासोबतच कारागिरांची कार्यक्षमताही सुधारते. आपली कार्यक्षमता चांगली असल्यास आपणास योग्य बाजारपेठ किंवा चांगल्या सेवेची संधीही उपलब्ध होवु शकतात.

                                Tools

     इलेक्ट्रिशन नाईफ :-  तारां वरील इन्सुलेशन काढण्यासाठी आणि वायर वरील पृष्ठभाग घासून साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो हा 50 mm व 75 mm लांबीचा डबल ब्लेडचा असतो. यातील दोन ब्लेड पैकी एक ब्लेड तीक्ष्ण धारदार असते आणि दुसरी ब्लेड खरखरीत कडा असलेली असते. जी ब्लेड धारदार असते त्याने वायरचे इन्सुलेशन काढले जाते आणि खरखरीत असते त्याने वायरचा पृष्ठभाग साफ केला जातो.






       कॉम्बिनेशन प्लायर  :- कॉम्बिनेशन प्लायर ही फोर्ज्ड स्टील पासून बनवलेली असते आणि लेगवर इंसुलेशन चढलेली असते. या प्लायर चा उपयोग तारांना पीळ देण्यासाठी, तारा जोडण्यासाठी तारांना इच्छेनुसार वाकवुन आकार देण्यासाठी, छोटे-छोटे नट खोलण्यासाठी व बसवण्यासाठी केला जातो. एकाच प्लायरने अशी अनेक कामे करता येतात म्हणून प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर असे म्हणतात.विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या प्लायर्स,ब्युरो ऑफ स्टॅंडर्ड 3605 नुसार या प्लायर्स 150 mm,200 mm आणि 250 mm लांबिच्या असतात .


    साईड कटिंग प्लायर :- यास डायगोनल कटिंग प्लायर असेही म्हणतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड 4378 नुसार या प्लायर्स 100 mm , 150 mm लांबीच्या असतात. या प्लायर्सचा उपयोग वायर वरील इन्सुलेशन काढण्यासाठी, अल्युमिनियम आणि कॉपरच्या 4mm पेक्षा कमी व्यासाच्या बारीक बारीक तारा कापण्यासाठी केला जातो.



     लॉंग नोज प्लायर  :-  नोज प्लायरला स्निप प्लायर असे सुद्धा म्हणतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड 5658 नुसार या  प्लायर्स 100 mm,150 mm लांबिच्या असतात. या प्लायर्स चा उपयोग अडचणीच्या ठिकाणी जेथे बोटे पोहोचत नाहीत अशा ठिकाणी लहान वस्तू पकडण्यासाठी केला जातो




        स्क्रू ड्रायव्हर :-   स्क्रू ड्रायव्हर याचा उपयोग स्क्रू काढण्यासाठी अथवा स्क्रू बसवण्यासाठी होतो. स्क्रू ड्रायव्हरचे हैंडल लाकूड किंवा सेलुलोज असिटेड किंवा हार्ड प्लास्टिकचे असते. हैंडल  पासून पात्यापर्यंतच्या सळईला शैक असे म्हणतात. हा शैक कार्बन स्टील पासून बनवलेला असतो. त्याच्या समोरच्या पातळ आणि चापत भागाला ब्लेड असे म्हणतात आणि ब्लेडच्या जाडीला पॉईंट अथवा टिप असे म्हणतात. ब्लेडला हार्डनिंग व टेंपरिंग केलेले असते. स्क्रू ड्रायव्हर ची साइज शैक पासून पॉइंट पर्यंत ची लांबी, शैक जाडी आणि टिपची जाड़ी यावर अवलंबून असते.
 





         नियॉन टेस्टर :- नियॉन टेस्टर याचे पाते पोलादी असून ते काचेच्या पोकळ मुठीत बसवलेली असते त्या मुठीत पात्याला स्पर्श करुनच एक नियॉन लैंप बसवलेला असतो. याच्या साह्याने आपण विजेचे अस्तित्व तपासता येते त्यासाठी हा टेस्टर आपल्या हातात धरून त्याचे पाते लाईनच्या वायरला स्पर्श करावे आणि आपण जमिनीच्या संपर्कात राहून टेस्टरच्या बटनाला बोटाने स्पर्श करावे त्यामुळे सप्लायची फेज  वायर आणि आपल्या शरीरा मार्फत आर्थिंग मिळून नियॉन लैम्पचे सर्किट पूर्ण होते आणि लैंप प्रकाशित होऊन विजेचे अस्तित्व समजते.
         हॅमर ( हातोडी ) :- पंचिंग,बेंडिंग,चिपिंग,स्ट्रेंथनिंग, फोर्जिंग आणि रिव्हेटिंग कामांमध्ये ठोकपित करण्यासाठी याचा उपयोग होतो.





      मेजरींग स्टील टेप :- ही मोजपट्टी पातळ स्टील  पात्यापासून बनवलेली असते. पाते 12 mm जाड व 2 मीटर लांब असते. पात्यावर मापे दिलेले असतात. या मोजपट्टीचा उपयोग वायरिंग करताना मोजमाप करण्यासाठी केला जातो.




          पोर्टेबल इलेक्ट्रिकल ड्रिलिंग मशीन :-   हे मशीन विद्युत प्रवाहावर चालते. या मशीनचा उपयोग त्वरित ड्रिंलीग केला जातो मशीन सोबत चेक की दिलेली असते. त्याच्या साहाय्याने चेक मध्ये ड्रिल बीट घट्ट बसवता येते. या मशीन 12  mm क्षमतेच्या असतात  मशीन वापरताना ड्रिल चेक मध्ये ड्रिल बिट घट्ट बांधावे, मशीन चालू करण्यापूर्वी मशीनला अर्थिंग व्यवस्थित जोडली आहे. याची खात्री करावी.



         ड्रिल  :-  ड्रिलिंग म्हणजे जॉब वर छिद्र पाडण्याची क्रिया होय. ड्रिलिंग करताना ड्रिल हे गोलाकार फिरत असते आणि खालच्या दिशेला दिलेल्या दाबाच्या साहाय्याने मटेरियलमध्ये घुसत असते.



              तुमचे प्रश्न कमेन्ट करा














1 comment: