Wednesday, 11 September 2019


                  Electrician Tools

     कामाच्या वेळी वायरमन आणि इलेक्ट्रिशियनला योग्य टूल्सचा वापर करणे महत्वाचे असते. कारागिरांची कामातील अचूकता आणि कामाचा वेळ हा योग्य टूल्सच्या वापरावर अवलंबुन असतो. जर टूल्स योग्य प्रकारे वापरले आणि सांभाळले तर, वायरमन / इलेक्ट्रिशियनची कार्यक्षमता वाढलेली असेल आणि कामाच्या सरावात तो कारागीर तरबेज झाला असेल.
टूल्सच्या योग्य पध्दतीने निगा व देखभाल केल्यास टूल्सचे आयुष्य तर वाढतेच - वाढते, त्यासोबतच कारागिरांची कार्यक्षमताही सुधारते. आपली कार्यक्षमता चांगली असल्यास आपणास योग्य बाजारपेठ किंवा चांगल्या सेवेची संधीही उपलब्ध होवु शकतात.

                                Tools

     इलेक्ट्रिशन नाईफ :-  तारां वरील इन्सुलेशन काढण्यासाठी आणि वायर वरील पृष्ठभाग घासून साफ करण्यासाठी याचा उपयोग होतो हा 50 mm व 75 mm लांबीचा डबल ब्लेडचा असतो. यातील दोन ब्लेड पैकी एक ब्लेड तीक्ष्ण धारदार असते आणि दुसरी ब्लेड खरखरीत कडा असलेली असते. जी ब्लेड धारदार असते त्याने वायरचे इन्सुलेशन काढले जाते आणि खरखरीत असते त्याने वायरचा पृष्ठभाग साफ केला जातो.






       कॉम्बिनेशन प्लायर  :- कॉम्बिनेशन प्लायर ही फोर्ज्ड स्टील पासून बनवलेली असते आणि लेगवर इंसुलेशन चढलेली असते. या प्लायर चा उपयोग तारांना पीळ देण्यासाठी, तारा जोडण्यासाठी तारांना इच्छेनुसार वाकवुन आकार देण्यासाठी, छोटे-छोटे नट खोलण्यासाठी व बसवण्यासाठी केला जातो. एकाच प्लायरने अशी अनेक कामे करता येतात म्हणून प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर असे म्हणतात.विद्युत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या प्लायर्स,ब्युरो ऑफ स्टॅंडर्ड 3605 नुसार या प्लायर्स 150 mm,200 mm आणि 250 mm लांबिच्या असतात .


    साईड कटिंग प्लायर :- यास डायगोनल कटिंग प्लायर असेही म्हणतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड 4378 नुसार या प्लायर्स 100 mm , 150 mm लांबीच्या असतात. या प्लायर्सचा उपयोग वायर वरील इन्सुलेशन काढण्यासाठी, अल्युमिनियम आणि कॉपरच्या 4mm पेक्षा कमी व्यासाच्या बारीक बारीक तारा कापण्यासाठी केला जातो.



     लॉंग नोज प्लायर  :-  नोज प्लायरला स्निप प्लायर असे सुद्धा म्हणतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड 5658 नुसार या  प्लायर्स 100 mm,150 mm लांबिच्या असतात. या प्लायर्स चा उपयोग अडचणीच्या ठिकाणी जेथे बोटे पोहोचत नाहीत अशा ठिकाणी लहान वस्तू पकडण्यासाठी केला जातो




        स्क्रू ड्रायव्हर :-   स्क्रू ड्रायव्हर याचा उपयोग स्क्रू काढण्यासाठी अथवा स्क्रू बसवण्यासाठी होतो. स्क्रू ड्रायव्हरचे हैंडल लाकूड किंवा सेलुलोज असिटेड किंवा हार्ड प्लास्टिकचे असते. हैंडल  पासून पात्यापर्यंतच्या सळईला शैक असे म्हणतात. हा शैक कार्बन स्टील पासून बनवलेला असतो. त्याच्या समोरच्या पातळ आणि चापत भागाला ब्लेड असे म्हणतात आणि ब्लेडच्या जाडीला पॉईंट अथवा टिप असे म्हणतात. ब्लेडला हार्डनिंग व टेंपरिंग केलेले असते. स्क्रू ड्रायव्हर ची साइज शैक पासून पॉइंट पर्यंत ची लांबी, शैक जाडी आणि टिपची जाड़ी यावर अवलंबून असते.
 





         नियॉन टेस्टर :- नियॉन टेस्टर याचे पाते पोलादी असून ते काचेच्या पोकळ मुठीत बसवलेली असते त्या मुठीत पात्याला स्पर्श करुनच एक नियॉन लैंप बसवलेला असतो. याच्या साह्याने आपण विजेचे अस्तित्व तपासता येते त्यासाठी हा टेस्टर आपल्या हातात धरून त्याचे पाते लाईनच्या वायरला स्पर्श करावे आणि आपण जमिनीच्या संपर्कात राहून टेस्टरच्या बटनाला बोटाने स्पर्श करावे त्यामुळे सप्लायची फेज  वायर आणि आपल्या शरीरा मार्फत आर्थिंग मिळून नियॉन लैम्पचे सर्किट पूर्ण होते आणि लैंप प्रकाशित होऊन विजेचे अस्तित्व समजते.
         हॅमर ( हातोडी ) :- पंचिंग,बेंडिंग,चिपिंग,स्ट्रेंथनिंग, फोर्जिंग आणि रिव्हेटिंग कामांमध्ये ठोकपित करण्यासाठी याचा उपयोग होतो.





      मेजरींग स्टील टेप :- ही मोजपट्टी पातळ स्टील  पात्यापासून बनवलेली असते. पाते 12 mm जाड व 2 मीटर लांब असते. पात्यावर मापे दिलेले असतात. या मोजपट्टीचा उपयोग वायरिंग करताना मोजमाप करण्यासाठी केला जातो.




          पोर्टेबल इलेक्ट्रिकल ड्रिलिंग मशीन :-   हे मशीन विद्युत प्रवाहावर चालते. या मशीनचा उपयोग त्वरित ड्रिंलीग केला जातो मशीन सोबत चेक की दिलेली असते. त्याच्या साहाय्याने चेक मध्ये ड्रिल बीट घट्ट बसवता येते. या मशीन 12  mm क्षमतेच्या असतात  मशीन वापरताना ड्रिल चेक मध्ये ड्रिल बिट घट्ट बांधावे, मशीन चालू करण्यापूर्वी मशीनला अर्थिंग व्यवस्थित जोडली आहे. याची खात्री करावी.



         ड्रिल  :-  ड्रिलिंग म्हणजे जॉब वर छिद्र पाडण्याची क्रिया होय. ड्रिलिंग करताना ड्रिल हे गोलाकार फिरत असते आणि खालच्या दिशेला दिलेल्या दाबाच्या साहाय्याने मटेरियलमध्ये घुसत असते.



              तुमचे प्रश्न कमेन्ट करा














Tuesday, 10 September 2019

Electrician safety

                     
                        Electrician safety

      आपले शरीर विजेचे मंदवाहक आहे. त्यामुळे जमिनीवर प्रत्यक्ष उभे राहून शरीराचा कोणताही भाग विजेच्या जिवंत भागाशी संपर्कात आल्यास,विजेचा शॉक बसतो.अशावेळी विद्युत प्रवाहाच्या मार्ग शरीरामार्फत जमिनीकडे वाहतो व आपले सर्किट पूर्ण करतो . त्यामुळे अचानक मज्जातंतूंवर परिणाम होवून भीतीदायक भयानक जाणीव होते . अशा जाणिवेला विजेचा धक्का इलेक्ट्रिक शॉक असे म्हणतात. विजेच्या शॉकची तीव्रता ही, शरीरामधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या सामर्थ्यावर व प्रवाह वाहण्याच्या वेळेवर अवलंबुन असते.
           शरीराचा विरोध कमी असेल तर जास्त करंट वाहतो व शरीराचा विरोध जास्त असेल तर करंट कमी वाहील.
साधारणपणे शरीरातून 2 ते 10 मिली अँपिअर  ( 0.002 ते 0.01 अँपिअर ) करंट वाहिल्यास इलेक्ट्रिक शॉक बसतो

       इलेक्ट्रीक शॉक बसण्याचे ठिकाण :

1 ) एखादी व्यक्ती जमिनीवर उभे राहून शरीराचा एखादा भाग जिवंत लाईनच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला इलेक्ट्रीक शॉक बसतो .
 2 ) जमिनीपासून इन्सुलेटेड होवून सुध्दा जर विद्युत सप्लाय लाईनच्या वेगवेगळ्या पोलरीटीच्या दोन वायर्स किंवा वेगवेगळ्या व्होल्टेजच्या दोन लाईनच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास इलेक्ट्रीक शॉक बसतो .
 3 ) इलेक्ट्रिक मशीनच्या धातुयुक्त बॉडीला जोडलेली
आर्थिन्ग योग्य नसेल व आशा बॉडीचा इन्श्युलेशन रेजिस्टन्स कमजोर असल्यास त्या बॉडीच्या संपर्कात आल्यास इलेक्ट्रिक शॉक बसतो.
 4 ) विजेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीस पुरेसे संरक्षण न घेता दुसऱ्याने त्यास प्रत्यक्ष स्पर्श केल्यास शॉक बसतो.

      विजेचा शॉक लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी

 1 ) विजेवर काम करताना नेहमीच इन्सुलेटेड हत्यारेच वापरावे.
 2 )  उपकरणांच्या धातुयुक्त बॉडीला आर्थिक जोडावे.
  3 ) चालू लाईन वर काम करू नये.
  4 ) विजेमुळे लागलेल्या आगीस विजवण्यासाठी त्यावर पाणी टाकू नये.
  5 ) वायरच्या जॉईंट वर इन्सुलेशन टेप गुंडाळावी.
  6 ) फ्यूज बदलते वेळी मेन स्विच बंद करावा.
   
        विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस दूर करतेवेळी घ्यावयाची दक्षता

          एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात आली असल्यास त्या ठिकाणचा वीजपुरवठा ताबडतोब बंद करावा. त्या व्यक्तीला जिवंत भागापासून दूर करण्यासाठी आपल्या हातात लब्री हात मोजे, कोरडे कापड, वर्तमानपत्राचा छोटासा गट्टा, वाळलेले लाकूड किंवा झाडू यांच्या साहाय्याने त्या ढकलून दूर करा.
कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीस प्रत्यक्ष आपल्या हाताने धरून ओडू नये.

        विजेच्या संपर्कापासून दूर केल्यानंतर घ्यावयाची दक्षता

 1 ) अपघाती व्यक्तीस मोकळ्या हवेत ठेवावे.
 2 )अपघाती व्यक्ती बेशुद्ध असल्यास त्यास शुद्धीवर आणण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छवास पद्धतीचा वापर करावा.     3 ) अपघात मोठ्या स्वरूपाचा असल्यास आणि शक्य असल्यास अपघातस्थळी डॉक्टरांना बोलावून आणावे.
   4 ) डॉक्टर येण्यापूर्वी आपण करीत असलेला उपचार हा प्राथमिक व तात्पुरता आहे हे लक्षात ठेवून उपचार करावा.
    5 ) शुद्धीवर आल्यानंतर त्यास चहा-कॉफी असे पेय पिऊ शकत असल्यास पिण्यास द्यावे.

      विद्युत क्षेत्रात काम करीत असताना घ्यावयाची काळजी

   1 ) कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी येथील सर्किट चा मुख्य स्विच बंद करावा व त्यातील फ्युज किट कॅट सुरक्षित ठिकाणी ठेऊन द्यावे.
    2 ) सर्किट जिवंत तार ( फेज किंवा पॉझिटिव्ह ) नेहमी स्विच मार्फत जोडावी.
   3 ) उपकरणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यास वीजपुरवठा ( सप्लाय ) देऊ नये अथवा उपकरण किंवा मशीन चालू करू नये.
     4 ) ओलसर जागेत उभे राहून काम करू नये.
      5 ) कोणत्याही उपकरणाची दुरुस्ती करण्यापूर्वी व ती खोलन्यापूर्वी त्याचा डायग्राम काढून ठेवावा.
      6 ) योग्य आकाराची फ्यूज तार  टाकावी.
      7 ) बॅटरी चार्जिंगच्या खोलीमध्ये जळती ज्योत नेऊ नये.

       ओवर हेड लाईन वर काम करताना घ्यावयाची काळजी 

   1 ) ओव्हरहेड लाईन वर काम सुरू करण्यापूर्वी त्या लाईन चा मुख्य स्विच बंद करावा व त्या ठिकाणी काम चालू आहे असा बोर्ड लावावा.
    2 ) सप्लाय चालू असताना काही किरकोळ स्वरूपाचे काम करावयाचे झाल्यास रबरी हातमोजे घालून काम करावे.
     3 ) लाईन बंद केल्यानंतरही सर्व लाईन कंडक्टर एका साखळी शॉर्ट करावेत व पुढे काम करावे.
     4 ) पोलवर काम करतेवेळी नेहमी सेफ्टी बेल्टच्या सहाय्याने काम करावे.

 
       विजेमुळे आग लागण्याची कारणे व उपाय 
   1 ) लूज कनेक्शन :- विद्युत मंडळात वायर्सची जोडणी करताना अथवा उपकरणांची जोडणी करताना अथवा ती जोडली  ढिली राहिल्यास, तेथे थोड्याशा धक्क्यानेही स्पार्किंग ( चिनगारी ) होते. त्यास स्पार्किंगमुळे आग लागू शकते.
    2 ) शॉर्ट सर्किट :- विद्युत मंडळात फेज वायर व न्यूट्रल
वायर प्रत्यक्ष एकत्र स्पर्श झाल्यास शॉर्टसर्किट होते. शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग होते आणि त्या स्पार्किंगमुळे आग लागू  शकते.

      3 ) ओव्हर लोडींग : - विद्युत मंडळात शॉर्ट सर्किटमुळे अथवा त्या सर्किटवर मर्यादेपेक्षा जास्तीचा लोड जोडल्यामुळे  सर्किट मधून वाजवीपेक्षा जास्तीचा करंट वाहू लागतो. जास्तीच्या करंटमुळे जास्तीची उष्णता निर्माण होऊन वायरवरील इन्सुलेशन विरघळून जळू लागते. त्यामुळेही आग लागण्याची शक्यता असते .

       आग विझवण्यासाठी अग्निशामकाचा उपयोग करणे 
     अग्निशामकाचे प्रकार : -  1 ) फायर बकेट
                                           2 ) हेलॉन अग्निशामक
                                           3 ) कार्बन डाय ऑक्साईड
                                                        अग्निशामक
                                           4 ) फोम अग्निशामक
                                            5 ) ड्राय पावडर                                                                      अग्निशामक